प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी शेतकरी विकास पॅनल (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रस्थापितांचा वर्ग तयार झाला आहे. हा वर्ग कोणत्याही पक्षातील दोन व तीन नंबरच्या फळीतील कार्यर्कत्यांना संघी देत नाही. सातत्याने तीच तीच मंडळी बँकेत दिसत आहे. हे धनदांडग्यांचे कारस्थान उधळून टाकण्यासाठी आम्ही समविचारी लोकांनी एकत्र येवून शेतकरी विकास पॅनल स्थापन करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी दिली. ते जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या दालनात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी सभापती रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे विलास पवार, विकास वाघ,

डी. जी. पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी व जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या सर्वपक्षीय पॅनल मोडीत काढल्याचा आरोप केला. कॉंग्रेस पक्षाकडून तुल्यबळ उमेदवार विकास वाघ, अविनाश भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष राजू रघुनाथ पाटील, डॉ. सुरेश पाटील हे उमेदवारी मागत असतांना त्यांना नाकारत कॉंग्रेस पक्षाशी ज्यांचा संबध नाही अशा शैलजा निकम, विनोद पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच शैलजा निकम ह्या कालपर्यंत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर होत्या. तर विनोद पाटील कॉंग्रेसचे साधे सभासद सुद्धा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांचे उमेदवार कॉंग्रेसच्या नावाने देण्याचा प्रयत्न केला असल्याचा स्पष्ट आरोप केला.

कॉंग्रेसचे उमेदवार देखील नाथाभाऊ ठरवितात -डी. जी. पाटील  

आमच्या नेत्यांनी रात्रीतून शैलजा निकम यांना कसे पुढे आणले ? त्याचा शोध घेणे सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. कॉंग्रेसचे नसलेल्या लोकांना उमेदवारी का दिली ? अशी तक्रार आपण प्रदेश कॉंग्रेसकडे करणार आहोत. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व आमदार शिरीष चौधरी यांनी निर्णय घेतला आहे. हे दोघे माझ्या पाठीशी होते. परंतु, कॉंग्रेसचे उमेदवार देखील नाथाभाऊ खडसे ठरवितात. एवढी दादागिरी या बँकेत चालली आहे. नाथाभाऊ यांनी मी ठरवेल तेच असे म्हणताच यांनी माना डोलाविल्या. त्यांना कॉंग्रेसचा उमेदवार ठरविण्याचा काहीएक अधिकार नाही. तेच राष्ट्रवादीमध्ये झाले. वर्षानुवर्षे विकास पवार,कल्पना पाटील हे राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेवून मेहनत घेत आहेत. आमदार-खासदार ही तेच मंत्रीही तेच आणि जिल्हा बँकेतही तेच. खरे म्हणजे मंत्री, आमदार-खासदार यांना एवढी कामे असतात की ते बँकेला न्याय देवू शकत नसतांना त्यांचा जिल्हा बँकेसाठी अट्टाहास का ? असा प्रश्न उपस्थित केला.

 

ना. गुलाबराव पाटलांच्या निर्णयाचे केले कौतुक

ना. गुलाबराव पाटील. त्यांनी स्वतः किंवा घरातील कोणीही उमेदवारी केलेली नाही. भाजप जि.प. आरोग्य व शिक्षण सभपती रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आमच्या सोबत आहे. कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यला तिकीट देण्यात आलेले नसल्याने संपूर्ण जिल्हा कॉंग्रेस आमच्या सोबत असल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते माझी पाठीशी – रवींद्र पाटील

भाजपचे जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले की, शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून मतांचा जोगवा मागणार आहोत. भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, मला ही माघार घेण्याबाबत सुचविण्यात आले. आपण मात्र यास साफ नकार देत आपण जेथे अर्ज दाखल करतो तेथे माघार घेत नसल्याचे ठणकावून सांगितल्याचे स्पष्ट केले. शेतकरी विकास पॅनल हे सर्व पक्षीय आहे. भाजपचे जिल्ह्याभरातील सर्व कार्यकर्ते माझ्या व पॅनलच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा दावा श्री. पाटील यांनी केला. सर्व पक्षीय पॅनल हे शेतकरी विकास पॅनल हेच असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

 

राष्ट्रवादीकडून दखल नाही – विकास पवार 

राष्ट्रवादीचे विकास पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ज्या प्रमाणे मुलाखत घेऊन उमेदवारी देण्यात आली. तीच प्रक्रिया जिल्हा बँक निवडणुकीत देखील राबविणे आपेक्षित होते. मात्र, नामांकन पत्र दाखल करून १५ दिवस उलटून ही राष्ट्रवादीकडून कोणी साधी चौकशी केली नसल्याची खंत व्यक्त केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/308060410913518

 

Protected Content