मुख्यमंत्र्यांनी माझ्याच घरात पैसे वाटले : धंगेकरांचा धक्कादायक आरोप

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे.

कसबा मतदारसंघात भाजपने मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप केल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी उपोषण केले होते. यानंतर काल मतदान झाल्यानंतर त्यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले असून याबाबत टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात पैसे वाटप केलं. ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं, असा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी?, असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Protected Content