जळगावात रेल्वेचा धक्का लागून वृध्दाचा मृत्यू

sucide

जळगाव, प्रतिनिधी । रूळ ओंडालतांना रेल्वेचा धक्का लागल्याने पिंपाळा परिसरातील एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१०) घडली. याप्रकरणी रामानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपालदास किसनदास बैरागी (वय ८२, रा. कुंभारवाडा, पिंप्राळा) असे मृत वृध्दाचे नाव असून भिक मागून त्याचा चारितार्थ चालत होता. दरम्यान, आज सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास खंडेरावनगर जवळून रेल्वे रुळ ओंडालत असतांना रेल्वे खांबा क्रं. ४१७\१६ जवळ समोरुन येणाऱ्या रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी रेल्वे ड्रायव्हर यांनी स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्याने त्यांच्या खबरीवरुन रामानंद पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास रवी नरवाडे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Protected Content