जळगावात तरुणाला धमकावणाऱ्या प्रौढास अटक

crime 2

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विजय प्रधान बागडे (वय ४९, रा. कंजरवाडा) यांचा मुलगा कुणाल विजय बागडे हा रविवारी एका लग्नात गेला असता गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ माचरे (वय ४०, रा.जाखनीनगर) याने त्याला शिवीगाळ करत धमकी दिल्या प्रकरणी विजय बागडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी गोपाल यास अटक केली आहे.

 

त्याच्याविरुद्ध धमकी देण्यासह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तींचे संरक्षण प्रतिबंध अधिनियम २०१६ चे कलम ५ व ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गोपाल माचरे याला अटक केली असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content