जळगावात पोलिसांना धमकावणाऱ्या नऊ वाळू माफियांना अटक

west sand

जळगाव, प्रतिनिधी । शहर वाहतूक शाखेतर्फे सुसाट व स्पीड गव्हर्नन्स नसलेल्या डंपरवर कारवाई करीत असताना वाळू माफीयांनी पोलिस अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. या प्रकरणात रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार सोमवारी नऊ वाळू माफीयांना अटक करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिलेले आहेत. डंपर्स भरधाव चालत आहेत. त्यांना स्पीड गव्हर्नन्स नसल्याने व वाहतूक नियमांचा भंग करीत असल्याने कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी (८ फेब्रुवारी) रोजी ही कारवाई सुरू असताना आकाशवाणी चौकात कैलास मंत्री (पूर्ण नाव माहित नाही) याने पोलिसांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. रस्त्यावर आंदाेलन करण्यासाठी जमाव गोळा केला तसेच आत्महत्त्या करण्याचीही धमकी दिली. यामुळे चौकात प्रचंड गोंधळ उडाला होता.

दरम्यान, हे आंदोलन मोडून काढणाऱ्या पोलिसांतर्फे वाहतूक शाखेचे पाेलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळु माफीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुनील श्रावण नन्नवरे (वय ५१, रा.बांभोरी), विठ्ठल भास्कर पाटील (वय ३३, अयोध्यानगर), रवींद्र सुरेश सपकाळे (वय ३०, रा.आहुजानगर), मयूर अरुण ठाकरे (वय २५, रा.मोहाडीरोड), प्रवीण हिरामण बाविस्कर (वय २२, रा.निमखेडी), बबलू उर्फ पंकज पुंडलिक सपकाळे (वय ३४, रा.वाल्मिकनगर), प्रवीण शामराव पाटील (वय ४७, रा.मेहरुण), सुभाष अमृत पाटील (वय ६३, रा.वैजनाथ) व बुधा पन्नालाल नन्नवरे (वय ५०, रा.बांभोरी) या नऊ संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.

यानंतर सीआरपीसी ४१ प्रमाणे पीआर बाँन्डवर त्यांची सुटका करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयित असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. मुख्य संशयित कैलास मंत्री (पूर्ण नाव माहित नाही) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संशयितांच्या अटकेसाठी पोलिस अधिक्षक डॉ.उगले यांनी स्वतंत्र पथक तयार केेले आहे.

Protected Content