भुसावळात तब्बल आठ दुकाने फोडली : नागरिकांमध्ये भीती

gharfodi

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील शांती नगर भागात असलेल्या पुखराज प्लाझामधील आठ दुकाने काल रात्री ११.३०च्या सुमारास अज्ञात चोरटयांनी फोडून १० हजार रोख आणि काही वस्तु घेऊन पलायन झाल्याची घटना आज (दि.१०) सकाळी उघडकीस आली. दरम्यान सर्व दुकानदार यांनी त्वरित शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे . चोरटे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे.

 

शहरातील पुखराज प्लाझा मध्ये एकूण नऊ दुकाने असून यातील प्रथमेश बेकर्स, दत्त डेअरी, बालाजी लेडीस, पूर्वा कलेक्शन, पालवी फॅशन, एस.आर.फोटो या दुकानाचे शटर वाकवून तर काही दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरटयांनी सुमारे १० हजार रुपये रोख व मालाचे नुकसान केल्याची माहिती दुकानदारांनी दिली.आहे. तसेच के.जे.मेंटल्स, डॉ.पांगळे यांच्या दुकानाचे व दवाखान्याची शटर व कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. शांती नगर भागातील पुखराज प्लाझामधील दुकान फोडण्यासाठी दोघे चोरटे तोंडाला काळा कपडा बांधून आले असल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्या मध्ये दिसून आले आहेत. त्यातील एकाने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करून दहा हजार चोरून पोबारा केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Protected Content