मू. जे.त जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड न्यूज प्रतिनिधी |  मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा २०२२ चे आयोजन मंगळवार दि. १८ रोजी करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य संजय भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी  जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा समन्वयक भूषण कविमंडल व डॉ. मनोज चोपडा आदी उपस्थित होते.

 

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा २०२२  चे आयोजन मंगळवार दि. १८  रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. त्याची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एकूण ७४४  पोस्टर व मॉडेलची नोंदणी झाली आहे. ही स्पर्धा चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. पोस्टर व मॉडेलसाठी  कृषी व पशुसंवर्धन ७४, वाणिज्य व्यवस्थापन व विधी ४९, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ८५, सामाजिक शास्त्र, भाषा, मानव्यविद्या, ललित कला १७६, औषध निर्माण शास्त्र ८७ , विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, गणित, पर्यावरण शास्त्र, गृह आणि संगणक शास्त्र) २६३  अशा एकूण ७४४  प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत. येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यांच्या सादरीकरणाकारीता लागणाऱ्या मुलभूत गरजा लक्ष्यात घेऊन सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एस. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केसीई संस्थेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या हॉलीबॉल प्रांगणात होणार असून विविध मॉडेल्सची मांडणी पदार्थ विज्ञान प्रशाळेत करण्यात येणार आहे. या संशोधन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी शिक्षक यांच्या संशोधनाची अधिक माहिती घेण्याकरिता विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालय परिसराला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य संजय भारंबे यांनी केले.

 

Protected Content