व्यापाऱ्यांचा माल घेवून न वटणारे चेक देणाऱ्या तिघांना इंदौरहून अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध ठिकाणच्या व्यापार्‍यांकडून माल घेवून त्यांना न वटणारे चेक देवून फसवणूक करणार्‍या टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुका पोलिसांनी याप्रकरणी तालुका पोलीसांनी तीन जणांना इंदोर येथून अटक केली आहे. तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप मिरचंद माखीजा रा. जळगाव, राहूल हिरालाल वाधवानी, हरिषकुमार उर्फ राहूल शोभराजमल पेशवानी दोघे रा. इंदूर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत जळगाव शहरातील खोटेनगर येथील अंबिका बिल्डर्स यांच्याकडून प्रदीप मखीजा, राहूल वाधवानी व हरिषकुमार पेशवानी या तिघांनी ६४२ टाईल्सचे बॉक्स खरेदी करुन त्यापोटी दुकानमालकाल ७ लाख ६ हजार २०० रुपयांचा जळगाव शहरातील युनीयन बँकेचा धनादेश दिला होता. प्रदीप मखीजा यांच्या नावाचा धनादेश बॅकेट वटविण्यासाठी दिला असता, बँकेत रक्कम नसल्याने तो वटला नाही. फसवणुकीची खात्री झाल्यावर अंबिका बिल्डर्सचे संचालक प्रशांत शांतीलाल पटेल वय ३३ र. गणपती नगर यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाचप्रकारे शहरातील अमर किचन वेअरचे संचालक जगदीश दादूमल मंधान रा. गणपती नगर यांच्याकडून १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे कुकर व स्टील खरेदी करुन संशयितांची फसवणूक केली होती. तसेच ईच्छादेवी चौकातील गोदावरी प्लायवूडचे परेश जगदीश तलरेजा रा. सिंधी कॉलनी यांच्याकडून ८९ हजार ६८० रुपये किंमतीचे प्लायवूड खरेदी केले. व त्याबदल्यात न वटणारा चेक देवून फसवणूक केली होती.

जळगाव शहरातील जितेंद्र इलेक्ट्रीकल्स ऍण्ड मल्टी ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच मालक सुशील संपतलाल पिंचा यांच्याकडून संशयित १२० सिलिंग फॅन खरेदी करणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रविकांत सोनवणे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील, वासुदेव मराठे, पोलीस नाईक विश्‍वनाथ गायकवाड, महेंद्र सोनवणे, अभिषेक पाटील यांच्या पथकासह जितेंद्र इलेक्ट्रीकल्स या या दुकानावर सापळा रचला व रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित प्रदीप माखीजा राहूल वाधवानी, हरिषकुमार पेशवानी या ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content