केंद्र व राज्याचे मोफत देण्यात येणारे धान्य रावेर गोडाऊनला प्राप्त

रावेर, प्रतिनिधी । शासनाकडून लॉकडाऊन काळात मोफत धान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे मे व जून या दोन महिन्याचे धान्य रावेर गोडाऊनवर प्राप्त झाले असून या महिन्यांत राज्य सरकारचे नियमित मिळणारे धान्य मोफत मिळणार आहे. तर याच महिन्यात केंद्राचे सुध्दा धान्य मोफत मिळणार एकंदरीत राज्य व केंद्र दोघांचे वेग-वेगळे धान्य मिळणार.

शासनाकडून मोफत वाटप करण्यात येणारे धान्य रावेर गोडाऊनवर प्राप्त झाले आहे. या महिन्यात दोन वेळेस मोफत धान्य गरीब कुटुंबाना मिळणार आहे. यामध्ये गहू व तांदूळ यांचा सामावेश आहे. तरी गरीब कुटुंबानी लक्ष ठेवून या महिन्यात दोन वेळा मोफत धान्य घेऊन जावे असे पुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.

प्रती व्यक्ती मिळणार पाच किलो धान्य 

या महिन्यात मोफत धान्य देण्यात येणार आहे. यामध्ये राज्य सरकारचे प्रतिव्यक्तीला पाच किलो प्रमाणे गहू व तांदुळ मिळणार आहे तर केंद्रातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रतिव्यक्तीला पाच किलो प्रमाणे गहू व तांदुळ मिळणार आहे तर अंत्योदय लाभार्थांना साखर २० रुपये किलो प्रमाणे मिळणार आहे.

भ्रष्ट्राचार होऊ नये म्हणून समिती गठीत 

दरम्यान मोफत धान्य गरीब कुटुंबाना वितरीत करतांना त्यात भ्रष्ट्राचार होऊ नये म्हणून पुरवठा विभागा कडून  शहर व ग्रामीण भागात समिती गठित करण्यात आली आहे. यातील नेमणुक करण्यात आलेले शासकीय कर्मचारी राशन दूकानावर उपस्थित राहतील व त्यांच्या समोर मोफतचे धान्य गरीब कुटुंबाना वाटप करण्यात येणार आहे.

 

Protected Content