भुसावळ नगरपरिषदेतर्फे दिव्यागांना मदत निधीचे वाटप

भुसावळ, प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेकडे एक वर्षांपूर्वी दिव्यागं निधी मिळण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना आज शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की ,दिव्यांगसाठी ५% निधी मदत म्हणून दिला जातो. यासाठी भुसावळ नगरपरिषदेकडे एक वर्षांपूर्वी दिव्यांग निधी मदत मिळण्यासाठी अर्ज केलेले होते. यामध्ये तीन टप्पे करण्यात आलेले आहे. यामध्ये ८० ते १०० % दुसरा टप्पा ७९ ते ६०% तिसरा टप्पा ६९ ते ४० % या टप्प्यांचा समावेश करण्यात आला. भुसावळ नगरपरिषद हद्दीतील ३७८ लाभार्थ्यांनानगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, लेखापाल संजय बाणाईते, सहा.लेखापाल विजय गाडेकर,अं तर्गत लेखा परीक्षक भांमरे मॅडम, शांताराम सुरवाडे यांच्या उपस्थितीत पाच दिव्यांगांना ५ हजाराचा चेक मदत निधी म्हणून वाटप करण्यात आला. तसेच बाकी लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये नगरपरिषद फंडातून पैसे जमा करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग जनकल्याण ग्रुप भुसावळचे शेख अकबर अहमद, इजरीज बागवान, सुनंदा कलाल, अब्दुल नबी पटेल, नाहार, राजू श्याम उपस्थित होते. ८० दिव्यांग लाभार्थ्यांना जे.डी.सी.सी. बँकेची अडचणी असल्याने निधी बँकेची अडचण दूर झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.

Protected Content