श्री.स्वामी समर्थ केंद्राचे आ.चंद्रकांत पाटील यांचे हस्ते भूमिपूजन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त सुगंगानगरात श्री स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

सुगंगानगरात सकाळी ९ वाजता संपन्न झालेल्या या कार्यक्रमाविषयी         बोलतांना आ. चंद्रकांत पाटील यांनी, “या स्वामी समर्थ केंद्राचे भूमिपूजन करतांना आनंद होत असून असून नागरीकांना या स्वामी समर्थ केंद्रात येऊन आध्यात्मिक साधना करता येईल याचे समाधान असल्याचे सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष सूरज परदेशी, भरत नेहेते, माजी नगरसेवक शामकांत पाटील, मा.नगराध्यक्षा अनिता येवले, मा.नगरसेविका नंदाबाई लोखंडे, मा. नगरसेवक धनंजय चौधरी, शिवसेना शहरसचिव शरद भारंबे, नितीन महाजन, प्रमोद माळी, शुभम चौधरी यांचे सह सुगंगा परिसरातील तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते

Protected Content