कोरोना संसर्गापासून संपुर्ण बचावासाठी तरूणाने केली ‘मास्क शिल्ड’ निर्मिती

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गापासून संपुर्ण सुरक्षा आणि मास्कवर लावता येणारी मास्क शिल्ड चाळीसगावातील तरूण चंद्रकांत ईश्वर जाधव यांनी तयार केली आहे.

चंद्रकांत यांनी एमएस्सी उच्च शिक्षण घेतलेले चाळीसगाव तालुक्यातील आहेत. तसेच ते भूजल सर्वेक्षण विभाग जळगाव त्यांच्या अधिनस्त असलेल्या उपविभागीय रासायनिक प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी आपण काय करू शकतो का ? याचा ते सतत विचार करत होते. त्याचवेळी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून फेस मास्क शिल्ड ची कल्पना सुचल्याचे जाधव यांनी सांगितले.

राज्यात पीपीई किटची मोठी कामकरता असल्याचे बातम्यांमधून समजले. तसेच राज्यात बरेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, पत्रकार व इतर कर्मचाऱ्यांना आता इंफेक्शन व्हाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरेल असे चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या फेस मास्क शिल्डची निर्मिती चंद्रकांत जाधव यांनी आपल्या स्वतः जवळील पैसे खर्च करून केली आहे. तसेच चाळीसगाव तहसील पोलिस स्टेशन, सुपरशॉप, काही पत्रकार तसेच महाराष्ट्र स्टेट बँक याना कमी खर्चात उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या प्रमाणावर फेस मास्क शिल्डची निर्मिती करण्याचा निर्धार आहे. जेणेकरून सगळ्यांना हे शिल्ड कमी दरात उपलब्ध होईल. त्यामुळे दानदात्यांकडून मिळणाऱ्या देणगीतून उत्पादन सुरू करावे, अशी त्यांनी इच्छा बोलताना व्यक्त केली.

Protected Content