दिल्ली हत्याकांडातील आरोपीस फाशी द्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिल्ली येथील निर्भायाच्या हत्याकांडातील आरोपीचा धिक्कार  व निषेध करून  हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी  अशी मागणी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की, आफताब  नावाच्या नराधमाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्याबरोबर लिव इन रिलेशनशिपमध्ये अगोदर मुंबई व नंतर दिल्लीत राहू लागली. परंतु, या नराधमाचे अन्य मुलींसोबत संपर्क असल्यामुळे तो  निर्भयाशी लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. या नराधमाने अत्यंत शांत डोक्याने षडयंत्र रचून निष्पाप निर्भयाचे अत्यंत क्रूरपणे, कौर्यही लाजेल  अशा पद्धतीने तिचे पस्तीस तुकडे करून ठार केले.  याबाबत सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे  राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी  यांच्या मार्फत  निवेदन पाठवून या घटनेचा व या  नराधम आरोपीचे  धिक्कार  व निषेध करून  हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, हाजी सय्यद जावेद, कामिल खान, हाजी शेख सलीमुद्दीन,  शफी ठेकेदार, आरिफ मुनाफ, शफिक अहमद, मुजफ्फर इब्राहिम, झिशान  हुसेन, वसीम मणियार, शाहरुख मुस्ताक इत्यादी उपस्थित होते.

 

Protected Content