आचारसंहितेपुर्वी तक्रारी निवारण, कामे पुर्ण करा ; प्रभाग सभापती डॉ. पाटील यांच्या सूचना

IMG 20190909 WA0044

जळगाव, प्रतिनिधी |    आज सोमवार ९  सप्टेंबर रोजी महापालिका प्रभाग समिती क्र. १  अंतर्गत असलेल्या कामांचा आढावा, नगरसेवक व नागरीकांकडील अडचणी तक्रारींचे निवारण करणेसाठी सभापती प्र.स.क्र.१ चे सभापती  डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकी दरम्यान नगरसेवकांकडून साफसफाईच्या तक्रारींचे तसेच प्रभाग समिती अंतर्गत सर्व कामे आचारसंहितेपुर्वी मार्गी लावणेबाबत संबंधितांना प्रभाग समिती सभापती यांनी सुचना दिल्यात. याप्रसंगी नगरसेवक किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, नगरसेविका प्रिया जोहरे,  सरिता नेरकर, गायत्री शिंदे,  रुकसानाबी गबलू खान, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी व प्रभागातील संबंधित अभियंते तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content