‘मरकज’च्या बातम्या वारंवार दाखवून सांप्रदायिक कलहाची परिस्थिती निर्माण केली जातेय : शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाच्या वारंवार टीव्हीवर बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे,असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निझामुद्दीन मरकजवरून देशभरात निर्माण झालेल्या वातावरणाविषयी चिंता व्यक्त केली.

दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती. तसेच वारंवार टीव्हीवर यासंबंधी बातम्या दाखवून सांप्रदायिक कलह वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्याच्या घडीला देशात ४०६७ करोनाच्या केसेस आहेत. तसेच ११८ मृत्यू झाले आहेत. ३२८ रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. हे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नाही. करोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो ही स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सूचनांचे पालन केले पाहिजे. ही आजची गरज आहे, असेही शरद पवार यावेळी म्हटले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर देशासमोर अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम आणि बेरोजगारीचे संकट उभे राहणार असल्याचा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला.

Protected Content