भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस

lata didi

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणारा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९०वा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता दिदिंना जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत.

लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाने मन्न अगदी प्रसन्न होते. परंतु जगविख्यात गायिका होण्यापर्यंतचा लतादीदींचा प्रवास फारच खडतर होता. तसेच लतादीदींनी गायिका होण्यापर्यंतच्या प्रवासासोबत अन्य क्षेत्रासुद्धा काम केले आहे. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी वडीलांच्या संगीत नाटकात अभिनय करायला सुरुवात केली. त्याचबरोबर 1945 साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात ‘बडी माँ’ या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती.

लता मंगेशकर यांची गाणी आजवर जरी ऐकली तरीही अंगावर शहारे येतात. तर 1942 साली आलेल्या ‘किती हसाल’ सिनेमात त्यांनी पहिले गाणे गायले. गाण्याचे बोल होते- ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी.’ पण शेवटी ते गाणे सिनेमातून कट करण्यात आले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी ‘पहिली मंगळागौर’ सिनेमात ‘नटली चैत्राची नवलाई’ हे गाणे गायले आणि ते त्यांच्या करिअरमधील पहिले गाणे ठरले.

Protected Content