Home राजकीय अजित पवार अद्यापही नॉट-रिचेबल !

अजित पवार अद्यापही नॉट-रिचेबल !

0
42

Ajit Pawar

अहमदनगर (वृत्तसंस्था) आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ‘नॉट रीचेबल’ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नेमके कुठे आहेत? हे आज पहाटे पर्यंत समजू शकलेले नाही.

 

 

शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर मुक्काम केला. तेथून पहाटेच ते इतरत्र निघून गेल्याचे कळते.
राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार हे त्यांच्या पुण्यातील भोसलेनगरमधील जिजाई बंगल्यात आल्याचं सांगितले जातं होते. मात्र सध्या या ठिकाणीही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मध्यरात्री त्यांचा धाकटा मुलगा जय पवारही या ठिकाणी आले होते. मात्र पहाटे 3.30 च्या सुमारास जय पवार हे सुद्धा बंगल्यातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येथे कोणाला भेटणे आणि बोलणेही त्यांनी टाळले, नेहमीचे सहकारी, नेहमीचे वाहनही त्यांनी टाळले.


Protected Content

Play sound