Home Cities जळगाव सुरभितर्फे लतादीदींना श्रद्धांजली

सुरभितर्फे लतादीदींना श्रद्धांजली

0
136

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  गानसम्राज्ञी लतादीदींचे दुःखद निधन झाले. सुरभीने लता दीदींना ऑनलाइन गाणे आणि स्व-रचित कविता म्हणून आदरांजली वाहिली जेणेकरून चाहत्यांना त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करता येतील.

सुरवातीला अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या. व त्यांनी गायलेले शेवटचे गाणे आता विसाव्याचे क्षण ह्या विषयीची आठवण सांगितली.

सीमा नाईक -वक्त के सितम

रोहिणी कुळकर्णी – रहे ना रहे हम

वैदेही नाखरे -ऐरणी च्या देवा

अविता जोशी – तुम मुझे भुला ना पाओगे

अंजली धवसे – तूच करीत आणि करविता

अविनाश राव व मंजुषा राव- नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जयेगा

आसावरी जोशी ह्यांनी सुद्धा लता दिदींची गाणे व स्वरचित कविता म्हणून तसेच तनुजा पाठक ह्यांनी शिट्टीच्या माध्यमातून एक प्यार का नगमा है गाणे गाऊन श्रद्धांजली वाहिली, कुंदाताई परांजपे, सुनीता नाईक, मंजुषा राव, सुनीता कुळकर्णी, साधना दामले, आशा जोशी, पौर्णिमा कुळकर्णी, ज्योती हनुमंते व इतर सभासद सहभागी झाले. लता दिदींना सर्व सुरभि ग्रुपतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 


Protected Content

Play sound