जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 56 व्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, राष्ट्रीय साठे सेना आणि मॉ. महाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी खासदार ईश्वरदादा बाबूजी जैन, माजी आमदार मनीषदादा जैन यांच्यासह शरद तायडे, नगरसेवक संतोष पाटील, जयश्री पाटील, पियुष पाटील, जितू बागरे, अरुण चांगरे, अतुल बारी, अमोल कोल्हे, प्रवीण कोल्हे, दीपक सुरवंशी, अनिल अडकमोल, आनंद सोनवणे, महेश चौधरी, मंगला बारी, बनसोडे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजहिताचा संदेश देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या, मानवतेच्या आणि परिवर्तनाच्या विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. नागरिकांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय साठे सेनेचे धीमंत रमेश साठे, मॉ. महाशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. आशाताई अंभोरे, सतीश गायकवाड, मुकेश अंभोरे, आनंद पाचुंदे, मनोज सपकाळे, यश अंभोरे, गोविंदा अंभोरे, राजू गायकवाड, विकास मरसाळे, मोहन मरसाळे, उज्वला सपकाळे, प्रियंका सपकाळे, रेखा गरुड, साधना चित्ते, संजना गोसावी, प्रतिभा जगताप, पौर्णिमा कोळी, गोपाल गायकवाड, जय गायकवाड, विनायक गायकवाड, हेमंत गायकवाड, संकेत गायकवाड, विजय मरसाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



