‘तुमचेच २५ आमच्या संपर्कात’ – दानवेंना सत्तारांचं प्रत्युत्तर

जालना – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । ‘महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून ते देखील अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते. असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी तुमचेच अर्थातच भाजपचेच २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हणत प्रत्युतर दिलं आहे.

 अब्दुल सत्तार यांनी अशाप्रकारे प्रत्युत्तर दिल्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधान आलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी त्यांचा वाढदिवस आणि धुळवड साजरी करताना वक्तव्य केलं होतम त्र्यात ”महा विकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत मात्र आज त्यांची नावं जाहीर करून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. निवडणुका येताच एक एक जण भाजपात प्रवेश करतील”  यावर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पलटवार करत, ” भाजपचेच २५ आमदार आमच्या संपर्कात असून तेच सुरक्षित ठेवा.” असं प्रत्युत्तर दिलंय.

Protected Content