कुंभारखेडा येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन पकडले

raver photo

रावेर, प्रतिनिधी | कुंभारखेडानजिक (ता.रावेर) येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करीत असतांना काल (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉली पकडली आहे. यामुळे गौण खनिज वाहतुकदारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

 

या बाबत वृत्त असे की, कुंभारखेडा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याची माहिती येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या पथकाला मिळाली हती. त्यांनी रात्री ११.३० च्या सुमारास धडक कारवाई करून ट्रॅक्टर टॉली जप्त केली आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल, प्रदीप आडे, तलाठी अजय महाजन, समीर तडवी, हनीफ तडवी, प्रवीण नारखेडे, पी.पी. नायदे, उमेश बाभुलकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Protected Content