कोरोना निदानासाठी उपकरणांचे वाटप

 

चोपडा : प्रतिनिधी । येथील विठ्ठल ॲप्फरो बीसीआय संस्थेतर्फे कोवीड संदर्भीय तपासणी साठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचे वाटप शाळांना करण्यात आले .

चुंचाळे (ता.चोपडा) येथे दि. 23 नोव्हेंबररोजी कोवीड तपासणीसाठी संस्थेकडून शाळांना हे तपासणीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य ऑक्सी मिटर व तापमापक मिटर शाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी देण्यांत आले

चुंचाळे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व मामलदे येथील एस आर पाटील माध्य.विद्यालय या शाळेत साहित्य देण्यात आले या प्रसंगी विठ्ठल ॲप्फरो संस्थेचे संचालक भरत इंगळे , बी.जी.महाजन, राकेश परदेशी , मयुर महाजन , महेंद्र कोळी उपस्थित होते.. हे साहित्य प्राचार्य आर एस सोनवणे मामलदे येथे मुख्याध्यापक सी बी पाटील यांना सुपूर्द करण्यात आले शिक्षक वृंद उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष प्रदीपभाई गुजराथी व संचालक मंडळाचे आभार मुख्याध्यापकांनी मानले.

Protected Content