चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर जप्त

Tractor news

जळगाव प्रतिनिधी । अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर्स महसूल प्रशासनाने कारवाई करून जप्त केले. ही वाहने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहेत.

ममुराबाद खेडी रस्त्यावरून ट्रॅक्टर्स व ट्रॉली विना क्रमांकची दोन वाहनात प्रत्येकी एक ब्रास वाळू तसेच एम.एच. १९ ए.पी. ७७२० या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक वाळू ब्रास आढळून आली. कोणतीही परवानगी नसताना या वाहनात वाळू भरून तिची अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे समोर आल्याने महसूल पथकाने सदर वाहनांविरोधात कारवाई केली. उपविभागीय अधिकारी दीपमाला चवरे व जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Protected Content