वाहतूकीची कोंडी करणाऱ्या 60 वाहनांवर कारवाई; 11 हजाराचा दंड वसूल

jalgaon crime news 3

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार ते सराफ बाजार एकेरी रस्ता असतांनाही दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष करुन एकाच बाजूने वाहने येतही होती व जात होती. यामुळे नियमित वाहतूक कोंडी होत असे. या नियमितच्या वाहतूक कोंडीबाबत येथील व्यापार्‍यांनी, दुकानदारांनी शहर वाहतूक शाखेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत वाहतूक शाखेतर्फे मंगळवारी सुभाष चौक ते खैरनार ऑप्टिकल्स वाहतूक कोंडीस कारणीभूत तसेच वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणार्‍या 60 वाहनधारकांवर कारवाई करुन 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे या दाणाबाजारातील रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला होता. कारवाईमुळे या रस्त्यावर जाणार्‍या अनेक वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली होती.

दाणाबाजार सह सुभाष चौक परिसरात एकेरी वाहतूकीबाबत वाहतूक शाखेचा फलक लावला आहे. असे असतानाही, नागरिक या फलकाकडे दुर्लक्ष करुन बिनधास्तपणे नियमांची अंमलबजावणी न करता वाहतूक करत होते. व्यापार्‍यांची तक्रारीची दखल घेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, नरेंद्र पाटील, संजय पाटील, संजय मराठे, स्वप्नाली सोनवणे, सचिन पारधी, परमेश्‍वर जाधव, मनिषा विसपुते, सुभाष चव्हाण याच्या कर्मचार्‍यांनी सकाळी सुभाष चौक गाठले. व वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. अचानकच्या कारवाईने वाहनधारकांची धांदड उडाली. कारवाईत वाहतूक शाखेने एकूण 60 वाहनधारकांकडून 11 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या परिसरात नियमित कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरिक्षक देविदास कुनगर यांनी केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2668811349865167/

Protected Content