पिंप्राळा परिसरातील विवाहितेला पाच लाखांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला पाच लाख रूपयांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील माहेर असलेल्या पुजा आनंद गवई यांचा विवाह जळगावातील आनंद नामेदव गवई यांच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले त्यानंतर पती आनंद गवई याने विवाहितेला पाच लाखांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने विवाहितेने पैसे आणले नाही. याचा राग आल्याने पती आनंद गवई याने विवाहितेला शिवीगाळ करून मानसिक छळ केला. सासू, सासरे, जेठ, नणंद व इतर नातेवाईकांनी देखील छळ करत घटस्फोट देण्याची धमकी दिली. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने ती माहेरी निघून आली. त्यानंतर बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती आनंद नामदेव गवई, सासरे नामदेव सदाशिव गवई, सासु मनोरमा नामदेव गवई, जेठ सचिन नामदेव गवई, जेठाणी बेबी सचीन गवई, नणंद नालंदा नामदेव गवई, रा. जिल्हा उद्योग केंद्र जळगाव, नातेवाईक वर्षा सदानंद तेलगोटे, प्रतिक्षा अमोल खंडारे रा. बाशापूर जि.आकोला यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.

Protected Content