Home Cities जळगाव ‘हसत-खेळत विज्ञान’ उपक्रमाने विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी; उन्हाळी शिबिरात अनोखा प्रयोग

‘हसत-खेळत विज्ञान’ उपक्रमाने विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी; उन्हाळी शिबिरात अनोखा प्रयोग


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘हसत-खेळत विज्ञान’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. मंगळवार,५ मे रोजी सकाळी ९.३० ते १२ या वेळेत रेल्वे स्टेशनजवळील ऐतिहासिक वल्लभदास वालजी वाचनालयात आयोजित उन्हाळी शिबिरात हा कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमात सुमारे ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमात प्रा. दिलीप भारंबे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने विज्ञानाचे विविध प्रयोग सादर करून दाखवले. दैनंदिन जीवनातील गोष्टींशी निगडित प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान सहज समजले, तसेच त्यांच्या मनात विज्ञानाविषयी कुतूहल आणि आवड निर्माण झाली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही प्रयोगांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील विषय नसून तो प्रत्यक्ष अनुभवातून अधिक चांगल्या प्रकारे समजतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. ‘हसत-खेळत विज्ञान’ या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांनी विज्ञान शिकण्याचा आनंद अनुभवला.

या कार्यक्रमासाठी महेश गोरडे, डॉ. शिल्पा बेंडाळे, डॉ. शुभदा कुलकर्णी, अ‍ॅड. अत्रे, सी.ए. देशपांडे, सी.ए. शहा यांसह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound