अंतुर्ली खु|| येथे धाडसी चोरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील अंतुर्ली खु” येथे बंद घरात अज्ञात चोरट्यांनी अनाधिकृतपणे प्रवेश करत घरातील २ लाख २० हजार रुपये किंमतीची सोन्या-चांदीची दागिणे चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, अंतुर्ली खु” ता. पाचोरा येथील रहिवाशी देविदास सुखदेव पाटील हे १७ डिसेंबर रोजी आपल्या परिवारासह बाहेर गावी गेले होते. दरम्यान १७ डिसेंबर ते १८ डिसेंबर रोजी सायंकाळ पर्यंत त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी अनाधिकृतपणे प्रवेश करत लबाडीच्या इराद्याने घरातील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या, ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्कीट, ४५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या व २५ हजार रुपये किंमतीची चांदी असा एकूण २ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याने देविदास पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे ह्या करित आहे.

 

 

 

Protected Content