यावल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाची वार्षिक सभा उत्साहात

yawal 222

यावल प्रतिनिधी । महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव (महाराष्ट्र शासन अंगीकृत) मनोकामना लोकसंचलीत साधन केन्द्र यावल येथील १०वी सर्वसाधारण वार्षिक सभा यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

सदरील सभेच्या अध्यक्षस्थानी निर्मला पाटील या होत्या तर बैठकीस प्रमुख उपस्थिती सहाय्यक जिल्हा सहनियंत्रण अधिकारी उल्हास पाटील, जिल्हा सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी युवराज पाटील, लिपिक दिप वाणी ,माविम लेखाधिकारी विजयकुमार स्वामी , मनोकामना लोकसंचलीत साधन केन्द्र यावल येथील व्यवस्थापक रवींद्र पाटील सर,यावल नगरपालिका क्षेत्रीय समनव्यक धनंजय पाटील, फैजपूर नगरपालिका क्षेत्रीय समनव्यक आशिष मोरे उपस्थित होते. आजच्या सभेत यावल तालुक्यातील सुमारे बचत गटाच्या 500 महिला उपस्थित होत्या. सदरील सभेत आदीवासी प्रकल्प स्तरीय नियोजन समितीच्या जिल्हा अध्यक्ष व जळगाव जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्य मीना राजु तडवी यांनी महिला बचत गटांना शासनामार्फत दिले जाणारे व्यवसाय प्रशिक्षण व महिला बचत गटांना विविध शासकीय योजनासंदर्भात महीलांना अचुक मार्गदर्शन केले. तसेच स्टेप उप इंडिया फाउंडेशनच्या समनव्यक रसिका जाधव यांनी महिलांच्या मासिक पाळी व आरोग्या संदर्भात घ्यायची काळजी व दक्षता या विषयांवर आपले मार्गदर्शन केले मुलींसह महिलांच्या मनातील शंका कुशंकाना आणी प्रश्नांना रसिक जानराव यांनी समाधान कारक उत्तरे दिलीत व महिलांना मासिकपाळीच्या वेळी घायची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोभा तायडे यांनी केले तर आभार धनंजय पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी हिरा तडवी, शारदा पाटील, शैलजा नारखेडे, लेखापाल श्याम गांधी व विधिध बचत गटातील महिलांनी सहकार्य केले.

Protected Content