जळगाव बसस्थानकासमोर एस.टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीचे उपोषण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव बस आगारातील बस कर्मचाऱ्यांनी  विविध मागण्यांसाठी आज बुधवार २७ ऑक्टोबर रोजी संप पुकारला असून उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीने घेतला आहे. याबाबत विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना निवेदन देण्यात आले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बस कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्यापपर्यंत पुर्ण केलेले नाही. कोरोनाच्या काळात बस कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवासी वाहतूक दिवस व रात्र सुरू ठेवली. असे असतांना महामंडळातील ३०६ हुन जास्त बस कर्मचाऱ्यांना कोरानामुळे मृत्यू झाला आहे. असे असतांना देखील कामगारांच्या विविध मागण्या मान्य केलेल्या नाही. त्यामुळे शासनात एसटीचे विलीनीकरण झाले पाहिजे, वार्षिक वेतन वाढीचा दर २ टक्के वरून ३ टक्के करण्यात यावे, महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या २८ टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे राज्य शासनाप्रमाणे देण्यात यावे, कामगार कराराप्रमाणे सर्व कामगारांना नियमित वेतन मिळावे, दिवाळी बोनस १५ हजार रूपये मिळाला पाहिजे, सण उचल १२ हजार ५०० मिळाले पाहिजे अशा प्रकारे विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी व बस कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज बुधवार २७ ऑक्टोबर रोजी जळगाव बसस्थानकासमोर उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

याप्रसंगी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी संयुक्त कृती समितीचे विनोद शितोळे, कामगार सेनेचे गोपाळ पाटील, इंटक संघटनेचे संदीप सुर्यवंशी, सुरेश तायडे, कैलास सोनवणे, रवि पाटील, इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंह राजपूत, कामगार संघटनेचे विभागीय सचिव योगराज पाटील, आर.के. पाटील, शैलेश नन्नवरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content