कळमसरे येथे हरिनाम कीर्तन सप्ताहास प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथे भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे यावर्षी ही अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला (दि.२६) अश्विन कृष्ण पंचमीपासून सुरुवात झाली असून (दि.२) रोजी काल्याचा किर्तनाने महाप्रसाद वाटप करून सांगता होणार आहे. दरम्यान, हरिनाम कीर्तन सप्ताहचे हे ४० वे वर्ष आहे.

यात दररोज नित्य पूजापाठ सह सकाळी ५ ते ६ काकडा आरती ,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८:३० ते १० :३० जाहीर किर्तनाचा कार्यक्रम होणार असून आळंदी येथील नामवंत कीर्तनकार उपस्थित राहणार असून ते खालील प्रमाणे दि.२६ मंगळवार रोजी हभप जयेश महाराज निमकर ,दि.२७ रोजी हभप जनार्दन महाराज मराठखेडेकर, दि.२८ रोजी हभप गुलाब महाराज लोणकर ,दि.२९ रोजी हभप गजानन महाराज आमोदेकर ,दि.३० रोजी हभप अनिल महाराज धरणगावकर, दि.३१ रोजी हभप सोपान महाराज मराठखेडेकर तर दि.१ रोजी दुपारी ४ वाजता संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका व विठ्ठल रुक्मिणी प्रतिमाचा पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप भावेश महाराज विटनेकर यांचे कीर्तन व दि.२ रोजी सकाळी ८ ते १० यावेळी हभप सुशील महाराज विटनेकर यांचे काल्याचा किर्तनाने हरिनाम कीर्तन सप्ताहाची महाप्रसाद वाटप करून सांगता होईल.

कार्यक्रमास ,निम ,पाडळसरे, तांदळी ,मारवड व परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करणार आहेत , तरी भाविकांची कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त भजनी मंडळ,ग्रामस्थ व आयोजकांनी केले आहे

 

Protected Content