देवगाव देवळी येथील विद्यालयात उदबोधनपर कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले विद्यालयात नुकताच बदलत्या वयातील जाणभान हा उदबोधनबर कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात दर्शना पवार यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधून त्यांचे उदबोधन केले. त्या म्हणाल्या की, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाईं फुले यांनी मुलींनी शिकाव हा हट्ट धरला. कारण व्यवस्थेतील लिंगविषमता मुलींना समजावी व मुलींनी त्याच्या वर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात पेटुन उठावे हा त्यांचा हेतू होता. या वयात विरूद्ध लिंगी व्यक्ती बद्दल आकर्षण वाटते. पण तुम्ही त्याला बळी पडु नका, भरपूर अभ्यास व्यायाम, आहार घ्या पुर्ण शिक्षण झाल्याशिवाय लग्न करु नका. आईवडीलांना कमी वयात लग्न केल्याचे दुष्परिणाम समजून सांगा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन,प्रा अस्मिता सर्वैया, सलोनी पाटील, रोहीणी धनगर या समाज कार्यच्या विद्यार्थ्यांनी होत्या.
प्रस्ताविक शिक्षक आय.आर महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले तर सुत्रसंचालन सलोनी पाटील यांनी केले तर आभार रोहीणी धनगर यांनी केले.

Add Comment

Protected Content