स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी|   भारतीय स्वातंत्र्याला  ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर  देशास सर्वत्र  आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले.

 

दि ९ ते  १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत १३ ऑगस्ट  ते १७ ऑगस्टमध्ये  हर घर तिरंगा अभियानाचे  आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत १४ ऑगस्ट रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी १० किलोमीटर मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे   १५ ऑगस्ट  रोजी प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच  १७ ऑगस्ट रोजी “समुह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील प्राचार्य डॉ. जी. एम. माळवटकर तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती. यात संस्थेतील  सर्व १५० प्राध्यापक कर्मचारी व ६५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभाग नोंदवला.  समुहाराष्ट्रगीता पूर्वी संस्थेच्या प्राचार्यानी सर्वाना राष्ट्रगीताचे महत्व स्वातंत्रविरांचे देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता केलेले योगदान याबाबत विचार मांडले. तसेच संस्थेतील सुरक्षा रक्षक प्रामुखा मार्फत सामूहिक राष्ट्रगीत म्हण्याकरिता संचलन करण्यात आले. ठिक सकाळी ११ वाजता सामुहिक गायनाची सुरवात केली. ७५ वर्ष पूर्ण झाल्याबाबतचा आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

Protected Content