महापालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेत सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन  करण्यात आले.  यात महापौर, आयुक्त तसेच मनपाचे विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्याबाबत राज्य शासनाने जीआर काढला होता. यानुसार आज महापालिकेच्या प्रांगणात ठिक अकरा वाजता सामुहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले.  देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबविण्यात येत आहेत.  नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन राज्य शासनाकडून करण्यात आले.  याप्रसंगी  महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, मु.ले.अ.चंद्रकांत वानखेडे , उपआयुक्त प्रशांत पाटील ,शहर अभियंता एम. जी .गिरगावकर ,सहा. आयुक्त अभिजीत बाविस्कर कार्यालय अधीक्षक अविनाश बाविस्कर, प्रभाग अधिकारी नरेंद्र चौधरी, नगरसचिव सुनील गोराणे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सूत्रसंचालन  हरीश्चंद्र सोनवणे  यांनी केले.

तसेच मनपाचे सार्वजनिक बांधकाम ,पाणीपुरवठा, आरोग्य, अंगणवाडी, बालवाडी वि.,दवाखाना विभाग, अग्निशमन विभाग, व त्यांची युनिट्स कार्यालये या ठिकाणी त्यांचे कार्यालयीन स्तरावर तेथील अधिकारी वर्गाने व मनपा प्रशासन अधिकारी दिपाली पाटील यांनी आपले शालेय स्तरावर एकाच वेळी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन त्या ठिकाणी थांबून केले.

 

Protected Content