संभाजी नगरातील बंद घरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संभाजी नगरात राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेचा बंद घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लिलाबाई यादव इंगळे (वय-५४) रा. संभाजी नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिलाबाई इंगळे या संभाजी नगरात वास्तव्याला होत्या. त्या भुसावळ येथे नोकरीला होत्या. अविवाहित असल्याने त्या संभाजी नगरात घरी एकट्याच राहत होत्या. मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात लिलाबाई इंगळे याचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांना दुर्गंधी आल्याचे हा प्रकार उघडकीला आला. याबाबत रामानंदनगर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, दोन ते तिन दिवसांपुर्वी त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी सांगितले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी १७ ऑगस्ट रोजी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content