‘त्या’ रुग्णालयात आयकर विभाकडून झाडाझडती सुरूच

जळगाव (प्रतिनिधी) बुधवारी सकाळी ८ वाजेपासून शहरातील रुग्णालय,लॅब,डायग्नोस्टिक सेंटर अशा एकूण आठ ठिकाणी आयकर विभाकडून एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्या होत्या. आज दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल २८ तासापासून झाडाझडती सुरूच आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकार विभागाकडून तपासणी केली जात असल्यामुळे या कारवाईचे गांभीर्य वाढले आहे.

 

राज्य आयकर विभागाच्या मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथील पथकांनी बुधवारी जळगाव शहरातील आठ रुग्णालये, पॅथॉलाॅजी लॅबसह डायग्नोस्टीक सेंटर्सवर सशस्त्र पोलिस बंदोबस्तात धाडी टाकून झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. त्यात मू. जे. महाविद्यालय रस्त्यालगतचे डॉ. विकास बोरोले यांचे नेत्रम हॉस्पिटल, भास्कर मार्केटमधील डॉ. सुनील नाहाटा यांचे वर्धमान अॅक्सिडेंट हॉस्पिटल, इंडो-अमेरिकन हॉस्पिटल व गोल्ड सिटी हॉस्पिटल,डॉ. राजेश डाबी यांचे डाबी न्यूरो सेंटर, रिंगरोडवरील डॉ. अमोल महाजन यांचे मधुर हॉस्पिटल, डॉ. राहुल महाजन यांचे चिन्मय हॉस्पिटल व आंेकारेश्वर मंदिराजवळील डॉ. सुधीर शाह, समीर शाह यांचे शाह डायग्नोस्टीक सेंटर्ससह अाठ रुग्णालयांची आयकर विभागाच्या पथकांनी धाड टाकून तपासणी केली. दरम्यान, ईडीच्या नोटीसांना संबंधितांकडून समाधाकरण उत्तर न मिळाल्यास अशा प्रकारचे धाडसत्र राबविण्यात येत असते,असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत आयकर विभाकडून तपासणी सुरूच असल्यामुळे कारवाईचा नेमका तपशील मिळू शकला नव्हता.

Add Comment

Protected Content