घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित रवी प्रकाश चव्हाण (वय १९, रा. तांबापुरा) याच्या एमआयडीसी पोलिसांनी तांबापूरा येथील शेरा चौकातून अटक केले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार रवि प्रकाश चव्हाण हा सोमवार दि. ८ एप्रिल रोजी तांबापुरा परिसरातील शेरा चौकात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, मुकेश पाटील यांच्या पथकाने संशयित रवी चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या. पुढील कार्यवाहीसाठी संशयिताला यावल पोलीस ठाण्याचे कर्मचारी सिकंदर तडवी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content