पिस्तूलाचा धाक दाखवत रोखपालाची लुट करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या; पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांची माहिती

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मांडवे दिगरनजीक रोखपालाकडची १२ लाखांची रोकड पिस्टलाच्या धाकावर लूटण्यात आली होती. या गुन्ह्यात चार संशयित आरोपींचा सहभाग आढळला याप्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजत पत्रकार परिषदेत दिली. सागर बबन हुसळे (फेकरी, ता.भुसावळ) व अतुल दीपक खेडकर (लहुजी नगर, जामनेर) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ५ लाखांचे बोलेरो वाहन व लुटीतील १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार भीमराव लक्ष्मण तायडे (वय ४४, जामनेर) हे जामनेर येथील तेल व्यापार्‍याकडे नशिराबाद येथे रोखपाल आहेत. ३ एप्रिल रोजी तेल विक्रीतून आलेली ११ लाख ७ हजार ४२ रुपयांची रोकड कापडी पिशवीत टाकून ते मदतनीसासह जामनेरकडे दुचाकीने सुनसगाव, कुर्‍हे पानाचेमार्गे निघाले होते. बुधवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महादेव माळ ते मांडवा दिगर फाट्यांचे दरम्यान चिंचेच्या झाडाजवळ पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून त्रिकूटाने पिस्टलाचा धाक दाखवत रोकड असलेली पिशवी लांबवली होती. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा गोपनीय माहितीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भुसावळ तालुका पोलिसांनी संशयित आरोपी सागर हुसळे आणि अतुल खेडकर यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता फेकरी गावातून अटक केली. त्यांनी त्यांची केली असता गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Protected Content