हिराशिवा कॉलनीतील दोन बंद घर फोडले; सहा लाखांचा ऐवज लांबविला

chori

जळगाव प्रतिनिधी । तालुका पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हिराशिवा कॉलनीतील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी जवळपास सहा लाखांचा ऐवज लांबवून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एस.पी.साहेब चोरी, घरफोडीच्या घटना थांबतील का ? असा संतप्त सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे. चोरी, घरफोडीच्या घटनामुळे पोलीस हतबल झाले आहे.

शहरातील निमखेडी शिवारातील हिराशिवा कॉलनीत सुनंदा राजेंद्र भावसार यांचे घर आहे. राजेंद्र भावसार यांचे निधन झाले असल्याने जळगावातील घरी सुनंदा भावसार ह्या राहतात. मुलगा विशाल हा ठाणे येथे तर लहान मुलगा पुणे येथे नोकरी निमित्त आहे.दरम्यान सुनंदा भावसार व त्यांची मुलगी कोमल हे दोघे नाशिक येथे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे हिराशिवा कॉलनीतील घर बंद होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरात मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामधील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी ५.३० वाजता भावसार कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर त्यांनी घरात पाहिल्यानंतर समान अस्तावस्त फेकलेला दिसून आला.

पावणे सहा लाखांचे दागिने लांबविले
चोरट्यांनी कपाटातील १ लाख ५ हजार रुपयांची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १ लाख ८० हजार रुपयांच्या २० ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या चैन, १ लाख ५० हजार रुपयांच्या ५० गॅ्रम वजनाच्या सोन्याच्या बांगडया, १८ हजार रुपयांची ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ६० हजार रुपयांचे सोन्याचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले ९ जोड, १५ हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाची नत, १५ हजार रुपयांच्या १ ग्रॅम वजनाच्या बाह्या, ७ हजार ८०० रुपयांचे चांदीचे देवी देवितांचे चांदीचे नाणे, समई, पायल यासह घरातील महागडे कपडे असा एकूण ५ लाख ६३ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले.

मुलाला मुंबईत घर घेण्यासाठी दागिने ठेवले होते घरात
सुनंदा भावसार यांचा मोठा मुलगा विशाल हा ठाणे येथे कंपनीत असून त्याचा विवाह झाला आहे. त्याला ठाणे येथे घर घेवून देण्यासाठी सुनंदा भावसार यांनी सर्व दागिने एकत्रित जमविले होते. यातील काही दागिने मोडून त्यातील पैसे त्या मुलाला घर घेण्यासाठी देणार होत्या. चोरट्यांनी या दागिन्यांवर डल्ला मारला.

Protected Content