भरधाव मालवाहू रिक्षा लोखंडी खांबावर आदळली ; चालक किरकोळ जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास मालवाहतूक रिक्षा पुलाच्या लोखंडी खांबाला धडकल्याची घटना घडली. टक्करानंतर पुलावरील मोठा लोखंडी गर्डर खाली पडला. हा गर्डर रिक्षावर पडला असता तर मोठा अपघात झाला असता. दरम्यान, या घटनेत रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी बजरंग बोगद्याचे काम झाले आहे. नवीन बोगद्यामुळे वाहतूकी कोंडी टळते आहे. जळगाव शहरातील बजरंग बोगद्यातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी पिंप्राळा परिसराकडून भरधाव एक मालवाहू रिक्षा बजरंग बोगद्यातून जात होती. यादरम्यान पूलाच्या प्रवेश करण्यापूर्वी रिक्षाने पूलासमोर उभ्या लोखंडी खांबाला धडक दिली. यात पूलाच्या एका बाजुचे मोठे लोखंडी गर्डर थेट रिक्षावर कोसळले. घटनेत रिक्षाचे समोरील काचा फुटल्या तर रिक्षाचालकाच्या नाकाला दुखापत झाली आहे. दरम्यान आडवा लोखंडी गर्डरमुळे काही 

काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर रेल्वे प्रशासनाकडून के्रनच्या सहाय्याने हा गर्डर बाजूला करण्यात येवून अवघ्या काही मिनिटातच वाहतूक सुरळीत केली. रेल्वे सुरक्षा बलाचे जे.एस.काळे व मोहित कुमार यांनीही पुढील कार्यवाहीसाठी घटनास्थळी येवून घटनेची माहिती घेतली. तोपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता. दरम्यान घटनास्थळाहून रिक्षाचालक निघून गेल्याने रिक्षा व रिक्षाचालकाबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही.

 

Protected Content