जळगावात ‘मर्डर’ : चाकूने हल्ला करत तरूणाला संपविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील समता नगर भागातील रहिवासी असणार्‍या तरूणावर चाकूहल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार ( वय २८) हा तरूण एकटा राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

सागर नरेंद्र पवार हा तरूण समता नगरात एकटाच राहत होता. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणार्‍या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहे. यात एक आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: