भुसावळात अग्नीतांडव : वडलांचा मृत्यू तर मुलगा होरपळला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील महेश कॉलनी परिसरातील एका फ्लॅटला पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत कुटुंबातील वडलांचा मृत्यू झाला असून मुलगा होरपळला गेला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्ये मध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवाला वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू आल्या. तसेच आगीच्या ज्वाला आणि धुर बाहेर निघू लागला. यामुळे इमारतीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी त्यांना वाधवाणी यांच्या घराला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना पाचारण केले.

फायरब्रिगेडच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. दरम्यान, या आगीत केशवलाल वाधवाणी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररित्या होरपळला गेला आहे. त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेऊन मदतकार्य केले.

नगरसेवक महेंद्रसिंह उर्फ पिंटू ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले. वाधवान कुटुंबात चार जण राहत असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात बाजारपेठ पोलिसांन नोंद करण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: