यावल येथे वाढीव वीज बिलांविरोधात संतप्त महिलांचा मोर्चा

yawal newss 1

यावल प्रतिनिधी । येथील महावितरणव्दारे नव्याने बसवलेल्या वीजमीटरमुळे वीज ग्राहकांना वाढीव बिले आल्याने नागरीक त्रस्त झाले. आज अखेर शहरातील संतप्त महिलांनी महावितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

येथील महावितरणव्दारे नव्याने बसवलेल्या वीजमीटरमुळे वीज ग्राहकांना वाढीव बिले आल्याने संतप्त महिलांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. अव्वाच्या सव्वा वाढवुन दिलेली बीले तात्काळ दुरुस्तीच्या अटीवर महावितरणचे उपअभियंता ए. बी. दमाडे यांनी तात्पुरती बिलात दुरुस्ती केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

महावितरण कंपनीच्या वतीने शहरात नव्याने वीज मीटर बसवले या मीटरमुळे विजेच्या बिलात भरमसाठ वाढ झाली त्यामुळे दिले अव्वाच्या सव्वा आले असा आरोप करत येथील शिवाजीनगर महाराणा प्रताप नगर देशमुख वाडा महाजन गल्लीतील सुमारे 200 महिलांनी येथील चोपडा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयावर मोर्चा नेऊन 2 तास ठिय्या आंदोलन केले. संतप्त महिलांनी शहरात बसवलेले मीटर तात्काळ बदलून जुने मीटर बसवावे, यासह जुन्या मीटर प्रमाणेच विजेचे बिल आकारावे, अशी मागणी केली सहाय्यक अभियंता ए.बी.दमाडे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र महिला आक्रमक असल्याने वीज बिलात दुरुस्ती करण्याच्या अटीवर तात्पुरती बिले कमी केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

Protected Content