युवा नेता आदित्य ठाकरे यांचे एरंडोल, कासोदा येथे जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

98cc14ca 511f 4de3 be11 74578458da5f

एरंडोल/कासोदा, प्रतिनिधी | येथे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रेचे’ राष्ट्रीय महामार्ग चौफुलीवर सायंकाळी ५.०० वा. आगमन झाले. यावेळी वाजत-गाजत व विविध घोषणा देत ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच कासोद्यापासून एरंडोलपर्यंत मोटरसायकल रॅलीनेही यात्रेची सोबत केली .

 

या वेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या गाडीतून बाहेर येवून उपस्थित शिवसैनिक व युवा शिवसैनिक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थांना हात उंचावून अभिवादन केले. यावेळी त्यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, जगदीश पाटील, जि.प.सदस्य नाना महाजन, विवेक पाटील, वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर आमले, अतुल महाजन, कृणाल महाजन, दीपक गायकवाड, मोहन सोनवणे आदी मान्यवरांनी ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या वेळी नगरसेविका आरती महाजन व प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्षा मीना चौधरी, नगरसेवक नितीन बिर्ला, परेश बिर्ला, चिंतामण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र ठाकूर, रेवानंद ठाकूर, शरद महाजन, मंगेश जैस्वाल, मयूर बिर्ला यांचेसह शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.युवा नेते आदित्य ठाकरे हे एरंडोल येथे फक्त चार मिनिटे थांबले, या चार मिनिटात महाविद्यालयीन विद्यार्थां व युवा शिवसैनिक यांच्या उत्साहाला उधाण आले होते.

विद्यार्थ्यांचा हिरमोड :- शास्त्री महाविद्यालायाचे ३० ते ३५ विद्यार्थी त्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

पाकिटे व मोबाईल लंपास :- या वेळी गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारांनी दोघा भावंडांची पाकीटे व मोबाईल लंपास केल्याची जोरदार चर्चा होती. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

 

Protected Content