राज्यपालांना हटवा; युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी । राज्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारे राज्याचे राज्यपाल कोशारी यांची पदावरून हटविण्याची मागणी युवक काँग्रेसने केली असून याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणु च्या संक्रमणाने आपला देश मोठ्या प्रमाणावर संक्रमीत झाला आहे. यावेळेस लोकांचे जीव वाचवणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. या कालखंडात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आताचा परिस्थितीत भयानक आहे. विद्यार्थिच्या आरोग्य काळजी पोटी, विद्यार्थिचा आरोग्य बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाचा शैक्षणिक परीक्षा न घेण्याच्या महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र याचवेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक विद्यापीठ कायद्यावर बोट दाखवत विद्यार्थ्यांचा हिताच्या निर्णयाला राज्यपाल यांनी त्यांच्या अधिकार सांगून विरोध केला. त्यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यानमध्ये रोष निर्माण होत आहे. या आधीही महाराष्ट्र हिताच्या निर्णय घेण्यात राज्यपाल दुटप्पीपणा करीत असल्याचे दिसत आहे. यावरून महाराष्टातील विद्यार्थ्यांच्यात आक्रोश उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा हिताच्या निर्णयाला विरोध करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना त्वरित पदावरून हतवुन नविन राज्यपालांची नेमणूक करावी, अशी मागणी धरणगाव युवक काँग्रेसकडून करण्यात आली. यावेळेस धरणगाव तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी, विकास लांबोळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव चव्हाण, निलेश येवले, राजेंद्र ठाकुर, कुलदीप चंदेल हे युवकचे पदाधीकारी उपस्थित होते.

Protected Content