असंसर्गजन्य रोगांकडे दुर्लक्ष नको : डॉ.रवींद्र भोळे

पुणे प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या आजारामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे ,अशा वेळी ब्लड प्रेशर, मधुमेह, कॅन्सर ह्यासारख्या आजाराकडे रुग्णाचे दुर्लक्ष होते, लॉकडाऊनमुळे रुग्ण वेळोवेळी तपासणी करीत नाही.व ह्यासारख्या आजारामुळे प्रतिकार शक्ती क्षीण होऊन इतर आजार होण्याची शक्यता असते ,म्हणून कोरोना महामारीत नॉन कम्युनिकेबल आजारांकडे दुर्लक्ष होऊ नये असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे यांनी उरळीकांचन येथे व्यक्त केले.

डॉ.रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र येथे एन.सी.डी. कॅम्पचे आयोजन उरुळीकांचन प्रायमरी हेल्थ सेन्टरच्यावतीने करण्यात आले. यावेळी रुग्णाचा रक्तदाब, शुगर इतर जनरल तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.उरुळीकांचन डॉक्टर्स असोसिएशन ‘उकेडीए’चे फाऊंडर प्रेसिडेंट डॉ. रविंद्र भोळे, प्रायमरी हेल्थ सेन्टरच्या आरोग्यसेविका एम.ए. कोकरे, सीमा एस. चव्हाण रूग्णांची तपासणी केली .प्रायमरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम हयांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content