सिनेस्टाईल पाठलाग करून पाच लाखांच्या सागवानाच्या पाट्या जप्त

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी ते डोणगाव रस्त्यावर पोलिसांच्या पथकाने एका वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून सुमारे पाच लाख रूपये मूल्य असणार्‍या सागवानी पाट्या जप्त केल्या आहेत. तर वाहनचालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या सहकारी पोलीस कर्मचार्‍यांसह किनगाव परिसरात आज दिनांक १५ जून रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना डांभुर्णी डोणगाव रस्त्यावर एम एच झिरो पाच आर ३७ १९ या टाटा इनटूर हे वाहन वेगाने जात असल्याचे त्यांना दिसून आले. धनवडे यांना याबाबत संशय आला. यामुळे या वाहनाचा पोलीसांनी पाठलाग केला. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर एका ठिकाणी हे वाहन रस्त्यावर सोडून त्याचा चालक पसार झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी पोलीसांनी वाहनाची झाडाझडती घेतली असता त्या चारचाकी वाहनांमध्ये अत्यंत महागड्या सागवानी लाकडाच्या वीस पाट्या यात त्यांना आढळून आल्या. याचा बाजार भाव पाच लाख रुपये तर, सरकारी किंमत सुमारे अडीच लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यावल पोलीसांनी हे वाहन जमा केले असुन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेबुब तडवी, निलेश वाघ, जगन्नाथ पाटील, चालक भैय्या पाटील, मदतनीस युवराज घारू यांच्या पथकाने ही करवाई केली. यावल पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह पश्‍चिम विभागाचे वनक्षेत्रपाल विशाल कुठे, वाहन चालक भरत बाविस्कर, अशोक मराठे, वनपाल असलम खान यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या सागवानी लाकडाचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान दिवसा ढवळ्या इतक्या मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी होत असतांना वन विभागाचे याकडे दुर्लक्ष कसे ? हा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.

एका वाहनाचे दोन क्रमांक
पकडलेल्या वाहनाचे दोन क्रमांक मिळून आले आहे. यात पहिला बोगस क्रमांक (एमएच ०५ आर १९) आणि (एमएच १३ एझेड ३३८०) असे आढळून आलेत. दोन क्रमांक असलेल्या चारचाकी वाहनांचा वापर करून सागवान लाकडांची तस्करी करण्यात येत आसावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच सातपुडा पर्वतातील जंगलातून बेसुमार वृक्षतोड केला जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

Protected Content