जळगावातील बालाजीपेठेत चॉपर हल्ला करणारे चौघे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । भाडेतत्वावर असलेल्या घराच्या जुन्या वादातून तरुणांनी बालाजी पेठेत घरात घुसून घरातील तरुणी व तिच्या वडीलांवर चॉपरने हल्ला करणाऱ्या चौघांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

अशी आहे घटना ?
बालाजी पेठेत सतीश बद्री नारायण शर्मा (वय-५५) हे पत्नी मुले व सून या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोन्या चांदीचा व्यापार करुन ते उदरनिर्वाह भागवितात. घरावरुन न्यायालयात केस सुरु आहे. याच घराच्या वादातुन शनिवारी १३ जून रोजी रात्री आठ वाजता बालाजीपेठेतच राहणारे रोहित कांतीला तिवारी याच्यासह त्य़ांची ३ भावंडे शर्मा यांच्या घरी आले. वाद घालत रोहित याने घरातील शर्मा यांची मुलगी राधिका हिच्या चेहर्‍यांवर चॉपरने वार केले. यानंतर सतिष शर्मा यांच्याही मानेवर पोटावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर चारही जण पसार झाले होते. कुटुंबियांनी दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी सतीश बद्री नारायण शर्मा यांच्या फिर्यादीवरून रोहित कांतिलाल तिवारी, राहुल कांतिलाल तिवारी, कैलास मदनलाल तिवारी, सत्यनारायण मदनलाल तिवारी या चौघांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील फरार चारही आरोपींनी शनी पेठ पोलीस ठाण्याचे पोहेकॉ दिनेशसिंग पाटील, रविन्द्र पवार, परिस जाधव, अभिलाषा मनोरे, धनजय येवले यांनी आज सकाळी चौघांना अटक केली आहे.

Protected Content