डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात दहीहंडी उत्साहात (व्हिडीओ)

avinash school

 

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज दि. 23 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धेचे आयोजन केले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण पाळणा आरतीने करण्यात आली. पुनम दहिभते आणि पूजा साळवी यांनी भजन व गीत सादर केले. विजय पाटील व तुषार पुराणिक यांनी संगीत साथ दिली. तसेच कालियामर्दनवर आधारित नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. याचे लेखन दिग्दर्शन प्रमोद इसे व केतन वाघ यांनी केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीनिमित्त इयत्ता 1 ली ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परिक्षण सीमा पाटील आणि वंदना सावदेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सौ गोहिल व मुख्याध्यापिका योगिता शिंपी होत्या.

तसेच ‘गोविंदा रे गोपाला’ या गाण्यावर मुलींनी नृत्य सादर केले. सविता चौधरी व प्रतिभा चौधरी यांनी नृत्य बसवले. ‘हातीं घोडा पालखी जय कन्हैय्या लाल की’ च्या जय घोषात मुलांनी दहीहंडी फोडली. सूत्रसंचालन संध्या काटोले तर परिचय पुनम दहिभते यांनी केला. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले होते.

Protected Content