मुंबई-वृत्तसेवा । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर झाला आहे. यंदा देखील या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
इयत्ता 10वीचा निकाला जाहीर झाला असून राज्याचा निकाल 92.09 टक्के लागला आहे. यंदा राज्यात 179 विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. हा निकाल ॲानलाईन जाहीर झाला आहे. राज्यभरातून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांतर्फे यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. याचाच निकाल आज लागला असून याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी पत्रकार परिषेदतून दिली आहे.

कोकण विभागातून सर्वाधिक ९७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर च कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे. राज्यातून ६ हजार ६१२ शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर ४ लाख ८२ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४ टक्के आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल २ टक्क्यांनी घसरल्याची माहिती देखील समोर आली आहे.



