Home उद्योग जळगाव जिल्ह्यात २७ इंटर्नशिपच्या सुवर्णसंधी ; नामांकित कंपन्यांमध्ये मिळणार संधी

जळगाव जिल्ह्यात २७ इंटर्नशिपच्या सुवर्णसंधी ; नामांकित कंपन्यांमध्ये मिळणार संधी

0
6

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पेटीएम, एचडीएफसी बँक, बजाज जनरल इन्शुरन्स आणि मारिको लिमिटेडसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार असल्याने पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना प्रतिमहा ९ हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार असून, इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर ६ हजार रुपयांचे एकरकमी अनुदान देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना आर्थिक सहाय्यासह उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या PAYTM Payment Services Limited, Bajaj General Insurance Limited, HDFC Bank आणि Marico Limited या नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींसाठी दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारक तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे किंवा ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊनही मार्गदर्शन मिळू शकते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी पात्र युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि रोजगाराच्या नव्या संधींचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound